Posts
Showing posts from September, 2023
NGO SUMMIT SINDHUDURG 2023
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थानी एकत्र येऊन काम करावे - हेमंत राठी फेडरेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग मधील दहा संस्थाना निधी उपलब्ध करून देणार - हेमंत राठी ---------------------------------------------------------- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थानी एकत्र येऊन काम केले पाहिजे, आपण विश्वस्त आहोत एकदा का आपल्या कामाबद्दल देणगीदारांचा विश्वास आपल्यावर निर्माण झाला की देणगी कमी पडणार नाही असे विचार श्री. हेमंत राठी साहेब यांनी कोकण एनजीओ फेडरेशनच्यावतीने कुडाळ येथे आयोजित एनजीओ समिट सिंधुदुर्ग - 2023 चे उद्घाटन प्रसंगी बोलताना मांडले. येत्या काळामध्ये कोकण एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा संस्थांना विशेष निधी देण्याचे आश्वासन याप्रसंगी राठी साहेब यांनी दिले. श्री सुनील सौदागर यांनी मार्गदर्शन करताना या फेडरेशनची संस्थांसाठी आवश्यकता असल्याचे नमूद केले. श्री अशोक सारंग यांनी संस्थांच्या नियमित कामकाजाबद्दल आणि लेखापरीक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. श्री पंडित यांनी विविध निधी, अनुदान, सीएसआर फंड कसा प्राप्त करता येईल याव...