NGO SUMMIT SINDHUDURG 2023

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थानी एकत्र येऊन काम करावे - हेमंत राठी

फेडरेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग मधील दहा संस्थाना निधी उपलब्ध करून देणार - हेमंत राठी

----------------------------------------------------------

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थानी एकत्र येऊन काम केले पाहिजे, आपण विश्वस्त आहोत एकदा का आपल्या कामाबद्दल देणगीदारांचा विश्वास आपल्यावर निर्माण झाला की देणगी कमी पडणार नाही असे विचार श्री. हेमंत राठी साहेब यांनी 

कोकण एनजीओ फेडरेशनच्यावतीने कुडाळ येथे आयोजित एनजीओ समिट सिंधुदुर्ग - 2023 चे उद्घाटन प्रसंगी बोलताना मांडले. येत्या काळामध्ये कोकण एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा संस्थांना विशेष निधी देण्याचे आश्वासन याप्रसंगी राठी साहेब यांनी दिले.



श्री सुनील सौदागर यांनी मार्गदर्शन करताना या फेडरेशनची संस्थांसाठी आवश्यकता असल्याचे नमूद केले. श्री अशोक सारंग यांनी संस्थांच्या नियमित कामकाजाबद्दल आणि लेखापरीक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. श्री पंडित यांनी विविध निधी, अनुदान, सीएसआर फंड कसा प्राप्त करता येईल याविषयी मार्गदर्शन केले, तर एनजीओ समिट विषयी प्रस्ताविक फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री भालचंद्र राऊत यांनी केले त्याचप्रमाणे अध्यक्ष श्री. अविनाश पराडकर यांनी मार्गदर्शन केले

कोंकण एनजीओ फेडरेशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, एनजीओ, ट्रस्ट यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने "एनजीओ समिट - सिंधुदुर्ग २०२३" चे आयोजन करण्यात आले होते. या समिटसाठी सुमारे २०० पेक्षा जास्त संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजासाठी काम करणाऱ्या सिंधुदुर्ग लोक शिक्षण संस्था, वळीवंडे देवगड, मातृत्व आधार फाउंडेशन  - मालवण, बॅ नाथ पै शिक्षण संस्था - कुडाळ, तिमिरातून तेजाकडे सामाजिक संस्था - सिंधुदुर्ग, डॉ. संदीप फाउंडेशन, बांदा,  पर्यटन व्यावसायिक महासंघ - सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर अँड टुरिजम डेव्हलपमेंट असोसिएशन - सिंधुदुर्ग, महाराष्ट्र लोकाधिकार समिती - सिंधुदुर्ग, अभाळमाया ग्रुप - कट्टा, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट - तळेरे कणकवली या दहा संस्थांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सन्माननीय हेमंत राठी साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर एम्पायर स्पाइसेस अँड फुड्स लिमिटेड (जगप्रसिद्ध राम बंधू मसाला) चे चेअरमन आणि सारस्वत बँक संचालक श्री. हेमंत राठी, सीए आणि सारस्वत बँक संचालक श्री. सुनील सौदागर, सीए श्री. अशोक सारंग, सीए श्री. सागर तेली, फेडरेशनचे अध्यक्ष श्री. अविनाश पराडकर, कार्याध्यक्ष श्री. भालचंद्र राऊत, सचिव श्री. चंद्रशेखर पुनाळेकर, मार्गदर्शक श्री यशवंत पंडित, श्री महेश मांजरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद कर्पे यांनी तर केले तर श्री महेश मांजरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. अभिमन्यू गावडे, श्री. राजस शेणई, श्री. गीतेश शेणई, श्री. राजेश साळगावकर, श्री. हर्ष पालव, श्री. प्रसाद मेहता, श्री. राजेश माने, ग्लोबल व्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. बाळा मेस्त्री आणि त्यांचे सहकारी यांनी विशेष सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog